पुणे,दि. २१( punetoday9news):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट ( संगम घाट ) याठिकाणी असलेल्या जून्या कमानिचे सुशोभीकरण करून लोकार्पण कार्यक्रम कार्यक्षम नगरसेविका लताताई दयाराम राजगुरू यांच्या हस्ते संपन्न झाला.
हा घाट ऐतिहासिक असून या घाटावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केल्याची माहिती ज्येष्ठ कार्यकर्ते देतात
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल दयाराम राजगुरू, अमोल दयाराम राजगुरू, उज्वला हाके, घनश्याम हाके, दत्ता जाधव, उदय घोलप,गणेश पुजारी ,माणिक चोरमले ,महादेव वाघमोडे, उमेश कोकरे, देवेंद्र धायगुडे,नागनाथ सोडगीर हे उपस्थित होते त्याचबरोबर सामाजिक चळवळीतील दीपक भोजने ,रोहित पांढरे,भीम देवकाते,विलास गडदे, विष्णु कुऱ्हाडे, तुकाराम शेंडगे , संतोष जानकर ,संभाजी कोळेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची संयोजन समिती संदीप कुरूवर, नरसिंग कोळी, उमेश धनगर, गणेश धनगर, मल्लेश धनगर, बीरप्पा शेरवे, नितीन सुसलादे, अशोक धनगर, बाबू भंडारी, नागेश पुजारी, नागेश धनगर, परशुराम कोळी, अरविंद लंगार, चेतन लंगार, नितीन पांढरे, विशाल कोकरे , गणेश घोलप, लींगप्पा धनगर, अमित जेरबंडी, महेश गायकवाड, कैलाश कांबळे, अमृत कोळेकर, प्रभाकर जरबंडी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले
Comments are closed