पुणे, दि. २३( punetoday9news):- पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे.

संशोधक डॉ. राजस नित्सुरे यांनी ही माहिती दिली आहे. तीन पिढ्यांनी अथकपणे सलग 10 वर्ष याबाबत संधोधन केले आहे. धूम्रपानाच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना आयुर्वेदिक धुम्रपानाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे आपण याचा कधीही वापर करू शकतो आणि बंदही. व्यसनाधीनतेकडून आरोग्य संपन्नतेकडे नेणारे हे संशोधन असल्याचे डॉ राजस सांगतात.

आयुर्वेदिक धुम्रपान ही भारतीय आयुर्वेदातील एक चिकित्सा आहे. त्याचाच वापर करून आयुर्वेदिक सिगारेट तयार करण्यात आली आहे. कफसारख्या विकारावर ही एक उपचार पद्धती आहे. श्वसनाशी संबंधित आजारावर ही उपचार पद्धती परिणामकारक ठरत असून व्यसनाधीन व्यक्तींना आयुर्वेदिक औषधी गोष्टींचा वापर करुन सिगारेट जर उपलब्ध झाल्यास त्यांची व्यसनातून मुक्तता होऊ शकते. त्याच अनुषंगाने हे संशोधन झाले आणि त्याला अखेर पेटंट प्राप्त झाले.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!