पिंपरी,दि.२४( punetoday9news):- मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा संघ तर्फे प्रा.आबाजी माने व प्रा.रामेश्वर हराळे यांची डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार  नगरसेविका आशाताई शेंडगे- धायगुडे व विजय भोजने (उपअभियंता पिं.चिं.महानगरपालिका) यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याचे पुजन प्रा. आबाजी माने सर व प्रा. रामेश्वर हराळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सन्मान मुर्ती प्राध्यापकांची शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख देण्यात आली.

नगरसेविका आशाताई शेंडगे व विजय भोजने यांनी दोन्ही पीएचडी साठी निवड झालेल्या शोधार्थींचे अभिनंदन केले व पुढील शोध कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी तानाजी धायगुडे, विजय महानवर, निलेश वाघमोडे, गोरख बंडगर, नितीन वाघमोडे, विठ्ठल देवकाते, दिपक काळे, पंडित काळे व इतर समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिपक भोजने व त्यांचे सहकारी यांनी केले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!