मोरवाडी,दि. २५( punetoday9news):- केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड भारत सरकार यांच्या तर्फे महिलांसाठी होणाऱ्या दोन दिवसीय प्रशिक्षणास मोरवाडी येथील कापसे उद्यान येथे सुरुवात झाली.
या प्रशिक्षणामध्ये महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण, महिला कायदे, महिलांसाठी शासनाच्या अनुदान व कर्ज योजना, आरोग्य, महिला सक्षमीकरण व सबलीकरण यावर मार्गदर्शन केले जात आहे. सदर प्रशिक्षणास पहिल्या दिवशी उपस्थित महिलांना प्रशिक्षणाची माहिती सुधाकर रामफुले यांनी दिली
याप्रसंगी नगरसेविका अनुराधा गोरखे, सोनाली हिंगे, पल्लवी मरकड, रेणुका साखरे, आनंदा कुदळे, प्रशिक्षक सुधाकर फुले, गाडे , झिरपे, माडगूळकर व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रोहिणी रासकर, रेणुका भोजने यांनी केले.
Comments are closed