गुरुवार (दि.२७) रोजी वारजे जलकेंद्र , खडकवासला उपसा ( रॉ वॉटर ) केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य , विद्युत व यांत्रिकी विषयक कामे करावयाचे असल्यामुळे त्या काळात वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे . त्यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र व नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे .

पाणीपुरवठा बंद असणारा भाग ( वारजे जलकेंद्र ) : – भुसारी कॉलनी , शास्त्रीनगर , बावधन , भुगाव रोड परिसर , सूस रोड , बाणेर , बालेवाडी , पाषाण , वारजे हाय – वे परिसर , रामनगर , कर्वेरोड परिसर , एरंडवणा , कोथरुड , डेक्कन जिमखाना परिसर , जयभवानीनगर , सुतारदरा , डहाणूकर कॉलनी , परंमहंसनगर , कर्वेनगर , गांधीभवन , महात्मा सोसायटी , हिंगणे होम कॉलनी , हॅपी कॉलनी , गोसावी वस्ती , कॅनॉल रोड , वारजे जकातनाका परिसर इ . व नवीन होळकर जलकेंद्राकडील कळस , धानोरी , विमाननगर , लोहगाव पंचायत , शिवाजीनगर , भोसलेनगर , घोलेरोड , सेनापती बापट रोड , बोपोडी , खडकी , हनुमाननगर , जनवाडी , वैदुवाडी , मॉडेल कॉलनी , वडारवाडी , रेव्हेन्यु कॉलनी , पोलीस लाईन , मुळा रोड , संगमवाडी , पाटिल इस्टेट , भांडारकर रोड इत्यादी .

तसेच शुक्रवार दि . २८ रोजी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल . असे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!