पुणे, दि. २६( punetoday9news):- जगातल्या सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक कंपनी गुगल आता आपला विस्तार करत असून गुगल लवकरच आता पुण्यातही आपलं नवं ऑफिस सुरू करणार आहे. त्यामुळे आता अनेक आयटी प्रोफेशनल्सना गुगलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
Google ने पुण्यात या वर्षी नवीन ऑफिस सुरू करणार असल्याची घोषणा केली. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत हे ऑफिस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचं शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता अधिक आहे.
Comments are closed