औंध, दि.२६( punetoday9news):- पुणे शहरातील औंध येथील शिवाजी विद्यामंदिर प्रशालेत 73 वा प्रजासत्ताक दिन कोरोना योध्यांचा सन्मान व सत्कार करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शासकीय निर्बंधामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांची भूमिका बजावून राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन करून गायनाला सुमधुर वाद्याची, संगीताची साथ देऊन कार्यक्रमात रंग भरले.
कार्यक्रमास पुणे महानगर पालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष कैलासदादा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गणेश
कलापुरे, सचिन कलापुरे , संग्राम मुरकुटे, बाळासाहेब पवार, तहयात सदस्य, जनता शिक्षण संस्था, कोरोना योध्दा डॉ. जया धुंडेले, डॉ.विद्या जाधव आणि प्रशालेचे प्राचार्य राजू दीक्षित, उपप्राचार्य पोपटराव ताकवले, पर्यवेक्षिका भारती पवार, कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी. महाविद्यालय विभाग प्रमुख शिक्षिका तालीकोटी उपस्थित होते.
“प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर व पालन करने गरजेचे आहे , लोकशाही प्रधान देशामध्ये आपण राहतो. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.” असे विचार अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य राजू दीक्षित यांनी व्यक्त केले.
कैलासदादा गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनी सर्वाना शुभेच्छा संदेश दिला.शासकीय आदेशानुसार कोरोना योध्यांचा यथोचीत सन्मान आणि सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. प्राचार्य राजू दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
ध्वज ऑर्डर क्रीडा शिक्षक अशोक गोसावी यांनी दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी बिपीन बनकर यांनी केले.
Comments are closed