पिंपरी, दि. २७( punetoday9news):- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने प्रजासत्ताक  दिन सोहळा  उत्साहात संपन्न  झाला.

यावेळी  हिताची एस्टेमो ब्रेक सिस्टिम्स इंडिया प्रा.लि.चे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक संजय  आंभोरकर यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात  आले.  सामूहिक राष्ट्रगीत  गायन झाल्यानंतर यशस्वी  संस्थेच्या ‘यशोगाथा’  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात  आले.

( यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने  प्रजासत्ताक  दिन सोहळ्यात  यशस्वी संस्थेच्या ‘यशोगाथा’विषेशांकाचे प्रकाशन  करताना हिताची एस्टेमो ब्रेक सिस्टिम्स इंडिया प्रा.लि.चे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक संजय  आंभोरकर, यावेळी त्यांच्यासमवेत डावीकडून यशस्वी संस्थेच्या मार्केटिंग  विभागाचे  व्यवस्थापक प्रशांत  कुलकर्णी, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व यशस्वी संस्थेचे ऑपरेशन हेड  कृष्णा सावंत. )

तसेच प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने आयोजित करण्यात  आलेल्या ई  वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह या उपक्रमांतर्गत  यशस्वी संस्थेतील सदस्यांनी  तसेच अन्य नागरिकांनी  जमा केलेल्या  वापरात नसलेल्या  इलेक्ट्रॉनिक  वस्तू प्रातिनिधिक स्वरूपात  पुर्नवापरासाठी  तसेच योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी सामाजिक संस्थेला देण्यासाठी समन्वयक पवन शर्मा यांच्याकडे  सुपूर्द  करण्यात  आल्या.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या  आदेशानुसार मर्यादित  उपस्थिती सह  कोविड  नियमावलीचे पालन करीत कार्य्रक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.याप्रसंगी आभार व्यक्त करताना  आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे  यांनी  उपस्थितांना प्रजासत्ताक  दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांनी स्वतःला  एखाद्या  सामाजिक कार्यात

गुंतवून घेण्याचे आवाहन  केले.

यावेळी कार्यक्रमाला  यशस्वी संस्थेचे  ऑपरेशन हेड कृष्णा  सावंत, संस्थेच्या मुख्य  मनुष्यबळ  व्यवस्थापिका मनीषा खोमणे, मार्केटिंग  विभागाचे व्यवस्थापक  प्रशांत कुलकर्णी, अमृता  तेंडुलकर  यांच्यासह  संस्थेचे  विद्यार्थी  व अध्यापक वर्ग  उपस्थित  होते.

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!