नाशिक मधील सुप्रसिद्ध कवि संदीप जगताप यांनी कवितेच्या माध्यमातून वाईन वरील राजकारणावर मार्मिक भाष्य केले आहे.
?
वाईन…
सत्ता आणि सुंदरीच्या नशेपेक्षा
वाईनची नशा कमी आहे
वावरातल्या द्राक्षा पासूनच तयार होते
म्हणून विष नसण्याची हमी आहे
एकमेकांवर चिखल फेकण्यासाठी
वाईनला मद्य करू नका
शेतकऱ्यांचा बळी देऊन
खुर्चीचे ध्येय साध्य करू नका..!!
◼️संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
(मो न – 7218625960)
Comments are closed