पुणे, दि. २९( punetoday9news):- संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरूद्ध लढा पुकारून वास्तववादी व विज्ञानवादी धडे देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये घराणेशाहीच्या आरोपातून दोन गट पडले आहेत. एक गट डॉक्टर हमीद व मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करत असून दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत काम असल्याचे चित्र आहे.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले आहेत.
एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. ते समितीचे संस्थापक अध्यक्ष होते.
अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये.
संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत 25 वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण 7 कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने 7 कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे.
Comments are closed