सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय.
काॅपी बहाद्दरांवर राहणार वचक.
पुणे, दि. २९( punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश परीक्षा ऑनलाईन झाल्या खऱ्या पण काॅपीबहाद्दर विद्यार्थ्यांनी याचा गैरफायदा घेत हुशार मुलांच्या पुढे जात अंक मिळवताना दिसले. तर कित्येक ATKT धारक विद्यार्थ्यांची नौका ही किनारी लागली.
आता हा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे . एखादा विद्यार्थी परीक्षा देताना बोलताना आढळल्यास तसेच स्क्रीन सोडून बाहेर जात असल्यास त्यांना परीक्षेतून बाद करण्यात येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होत आहेत.
परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले
https://t.me/+V6NcxC4fix9hNDI1
Comments are closed