पिंपरी,३०( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छाग्रह उपक्रमा अंतर्गत आयोजित प्लॉगेथोन मोहिमेत केसबी चौक ते टाटा मोटर्स यशवंतनगर चौक रस्त्यावरील सुमारे ६ टन कचरा उचलण्यात आला.


सकाळी नऊ वाजता पासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ककरण्यात आला. त्यामध्ये सह शहर अभियंता रामदास तांबे,सहाय्यक आयुक्त अण्णा
बोदडे ,कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे,शशिकांत मोरे, यांचेसह ,मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जिनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे व वाघमारे आणि सौदे यांच्या सह ग्रीन रॉबिन हूड आर्मी या स्वयंसेवी संस्थेचे अमित अगरवाल,सुजीत पाटील, करिश्मा गांधी, आरुशी अगरवाल, देव आशिष, आकाश अगरवाल, सायाम रेहमान, जानवी, प्रणित वाबले, नचिकित खैरे, चेतन राव, ओंकार प्यारपाती यांच्या सह सुमारे ८० अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.



नागरिकांनी रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकू नये व रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छता करु नये. हे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.



 

Comments are closed

error: Content is protected !!