पिंपरी, दि. ३०( punetoday9news):- नाशिकचे दिग्दर्शक आणि निर्माते नीलेश आंबेडकर यांच्या मुंध्यार या मराठी लघुपटाला भारत सरकारच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे आयोजित ७ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
आयोगाच्या वेबसाइटवर निकाल जाहीर केले जातात आणि पुरस्कारामध्ये रोख 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असते. दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते लघुपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत देशभरातून एकूण 190 लघुपट सहभागी झाले होते. चित्रीकरण, संपादन मयूर सातपुते, संगीत शशिकांत कांबळी, गीतलेखन चरण जाधव आणि रुपाली कदम.
Comments are closed