गडचिरोली ( punetoday9news):-  गडचिरोली पोलीस वसाहतीतील महिला कॉन्स्टेबलने ( ३५ वर्षे)  विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला पोलीस कॉन्स्टेबल या दोन वर्षांपासून गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होत्या. तिचे दोन वर्षांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पराते यांच्याशी लग्न झाले असून ती गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहे. मृत संदीप पराते यांची दुसरी पत्नी आहे. २९ जानेवारी रोजी दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला.



त्यावेळी त्यांनी विष प्राशन केले होते, त्यांना उपचारासाठी गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी रात्री 10.30 च्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
रात्री गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आज, 30 जानेवारीला शवविच्छेदन होणार आहे. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येने पोलीस वसाहतीत खळबळ उडाली आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पूनम गोन्हे करीत आहेत.




 

Comments are closed

error: Content is protected !!