शिरूर, दि. ३०( punetoday9news):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरुर व सकाळ यिन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे उद्घाटन शुक्रवार (दि.28) रोजी केंदुर येथे संपन्न झाले.
यावेळी सविता पराड (उपसभापती प. स. शिरुर) यांची उपस्थिती लाभली तसेच सरपंच उपसरपंच जयश्री सुक्रे, सुषमा पराड (ग्रापं सदस्या), शालन भोसुरे (ग्रा.पं. सदस्य),
भरत साकोरे (ग्रा. पं. सदस्य), अमोल थिटे (ग्रा.पं सदस्य) विठ्ठल ताठवडे (ग्रा. पं सदस्य) सुनील दरेकर (ग्रा.वि अधिकारी) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. सचिन कोठावदे यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन प्रा. अमित लुंकड यांनी केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्दारकादास बाहेती , प्रा.डॉ. अमोल शहा, प्रा. डॉ. मनोज तारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. निशिकांत शिंदे, कर्मचारी संतोष साकोरे व संस्थेचे संस्थापक शिवाजी पडवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Comments are closed