पुणे, दि. १( punetoday9news):-  आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकीय ज्ञानापेक्षा सोशल मिडिया वर मिळणारे ज्ञान अधिक महत्त्वाचे बनल्याचे या प्रकरणात दिसून येते. संपूर्ण वर्षभर शालेय शिक्षण विभाग, शिक्षक यांनी परिस्थिती नुसार बदलत शिक्षणाचे कार्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चालू ठेवले. मात्र आजकाल पुस्तकी ज्ञानापेक्षा चार फडतूस डायलॉग मारणारे पंटर विद्यार्थ्यांना जास्त बहुमुल्य ज्ञान देतात असा समज बनत आहे. यालाही आवर घालण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा दुरूपयोग करून एखाद्या विषयातील सखोल ज्ञान, माहिती नसताना अशी बेताल वक्तव्य अज्ञानी व्यक्तीच करू शकते. 

म्हणे याच भाईचं परीक्षा ऑनलाइन घ्यावी हे ऐकून विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले.  हे पाहता आपला हाच भारत देश आहे का? जो संघर्ष, संकटात ही न डगमगता उभा आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि साध्या परीक्षेला पर्याय शोधणारी ही भविष्यातील भावी पिढी ?

आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे आजची पिढी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद यांचे विचार, आदर्श सोडून आभासी जगातील सोने चांदी अंगावर घालून, चकाकक कपडे घालून, गाडीत बसून फडतूस डायलॉग मारणाऱ्यांना आदर्श मानू लागलीय ही मोठी शोकांतिका आहे.

आज विद्यार्थ्यांना या आभासी जगाचे लागत असणारे व्यसन थांबवणे हे नितांत गरजेचे आहे. यासाठी शाळे सोबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी अधिक जागृत असायला हवे. समाजातील बदललेली परिस्थिती व सोशल मिडियाचा विद्यार्थ्यांवर पडत असलेला प्रभाव थांबवणे हे ही फार महत्त्वाचे आहे. अन्यथा केवळ अर्थाजन हेच जीवनाचे ध्येय मानणारी पिढी व समाज तयार होईल. भविष्यातील भारत हा बलशाली, तत्वज्ञानी व विद्वानांचा हवा असेल तर आजचा विद्यार्थी कसा असावा हे निश्चित करावे लागेल.

ऑफलाईन परीक्षा नको म्हणून आंदोलन करणारे विद्यार्थ्यी ( व्हिडिओ)

 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावर बोलताना म्हणाल्या, “आम्ही तज्ञांशी चर्चा करूनच ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी आधी आमच्याशी चर्चा करावी. अशा पद्धतीची कृती यावर उपाय असू शकत नाही.”

“बोर्डाच्या परीक्षा कशा पद्धतीने होतील यासंदर्भातील SOP लवकरच आम्ही देऊ. पण परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार आम्ही करत नाहीय. गेली दोन वर्षं परीक्षा रद्द झाल्या. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.




Comments are closed

error: Content is protected !!