♦ फिर्यादीने दिली पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार.
♦ १ लाखाची रक्कम देण्यास फिर्यादीने विरोध केल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.
पिंपरी,दि.२ ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना ५५ हजारांची खंडणी घेतल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.
भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेत दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशव घोळवे आणि हसरत अली शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे.
शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून ५५ हजारांची खंडणी घेतली असून आरोपींनी एक लाखांची मागणी केली होती व त्यास विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असे या तक्रारीत म्हटले आहे
Comments are closed