लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्स दिल्या जातात. मात्र किया कंपनीच्या कारमध्ये एअरबॅग संबंधी त्रुटी आढळून आल्याने कंपनीने आपल्या चार लाखाहून अधिक कार बाजारातून परत मागवल्या आहेत. या कार अमेरिकेत दुरुस्तीसाठी जाणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून कंपनीने हा निर्यण घेतला आहे.
किया कंपनीने ज्या कार परत मागितल्या आहेत त्यात २०१७ आणि २०१८ मॉडेलच्या फोर्टच्या लहान कारचा समावेश आहे. आणि २०१७ ते २०१९ पर्यंतच्या सेडोन मिनीव्हॅन व सोल छोटी एसयूव्ही कारचाही यात समावेश आहे. यात अशा सर्व मिळून तब्बल चार लाख दहा हजार कार या कंपनीने परत मागवल्या आहेत.
किया कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारच्या एअर बॅग्स कंट्रोल कॉम्पुटर कव्हर मेमरी चिपशी संपर्क होऊ शकतो आणि यामुळे इलेक्ट्रिक सर्किटला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे या कारच्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याची गरज आहे. कारच्या मालकांना २१ मार्चपासून कंपनीद्वारे ईमेलच्या माध्यमातून याबाबतची सूचना दिली जाणार आहे.
या महिन्यात, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केले आहे की, आठ प्रवासी क्षमता असलेल्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या जीएसआर अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. M1 वाहन श्रेणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण पुढील आणि मागील रांगेतील प्रवाशांसाठी चार अतिरिक्त एअरबॅग प्रदान करणे बंधनकारक आहे. जेणेकरुन कार पुढच्या बाजूने कुठेही धडकली किंवा कारला मागून कोणत्याही वाहनाने धडक दिली तर त्या टकरीचा प्रभाव कमी करता येईल.
Comments are closed