पिंपळे गुरव, दि. ३( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील भगतसिंग चौकामध्ये आद्य क्रांतिकारक वीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला हार व पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उमाजी नाईक यांनी इंग्रजांना दिलेल्या कडव्या झुंज विषयी वर्णन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महापौर माई ढोरे होत्या तर नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, नगरसेविका उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, तानाजी जवळकर, संजय मराठे, सुभाष जाधव, अस्मिता कांबळे विजय धनवटे, रोहिदास मदने, सुरेश चव्हाण, शांताराम गोपने, शेखर गोरगले, आशा तोटले, नीलिमा मदने, शीतल गोरगले, चंद्रभागा जाधव, कल्पना माकर, कल्पना जाधव, प्रीती जाधव, बाळासाहेब चव्हाण, किरण धनवटे, अनिल साळुंखे, वसंत बुधावले, अनंत चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय मराठे यांनी केले तर आभार सुभाष जाधव यांनी मानले.
Comments are closed