● अप्रत्यक्षपणे दोन्ही आमदारांवर परखड टीका.  

● पिंपरी-चिंचवडमहानगरपालिकेत माझ्या मुळे सत्ता आली होती आता मी त्यांची सत्ता घालवणार असे वक्तव्य. 

● पुन्हा येणार म्हणणारे आज कुठेयत? असा उपरोधिक टोला. 

पिंपरी, दि. ४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. 

यावेळी महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर आरोप करताना एकनाथ खडसे म्हणाले कि, भाजपा कडून ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जातो ते मला मान्य नव्हते. मी सायकल वरून प्रचार केलेल्या पक्षाने मला डावलले ही अनपेक्षित बाब होती.




तसेच खानदेशचा मुख्यमंत्री झाला नसल्याची खंतही व्यक्त केली.
पुन्हा येणार म्हणणारे आजकुठेयत असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना ते म्हणाले की चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा मुहूर्त काढतात. पण तो मुहूर्त निघू शकत नाही.

स्थानिक प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तास पाणी पुरवण्याची घोषणा खोटी ठरली असून पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना जेल मध्ये पाठवणार.



संबंधित कार्यक्रमास स्थानिकांपेक्षा खानदेशी रहिवाशांची गर्दी अधिक असल्याची चर्चा होत असल्याने या गर्दीचा मतदानात किती फायदा होईल असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!