महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची लेखी परीक्षा,
तर ४ ते ३० मार्च दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असून,
शाळा तेथे परीक्षा केंद्र या धर्तीवर दहावी आणि बारावीची परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत.
पुणे, दि. ४( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती देण्यात आहे. परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात यासाठी राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी
दिलेल्या माहितीनुसार, वेळापत्रकानुसार दहावीचे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान, १४ ते ३ मार्चदरम्यान बारावीचे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन होईल. या परीक्षेच्या काळात विद्यार्थी आजारी असल्यास किंवा अन्य अपरिहार्य कारण असल्यास विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाईल.
अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आल्याने लेखी परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर होईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
दहावी, बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख आहे. एवढ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नाही. पुरवणी परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे नियोजन आहे. परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा देता येईल. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कमी प्रवास करावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिषदेत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
Comments are closed