पिंपरी,दि. ४( punetoday9news):- ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त साह्यकडा ऍडव्हेंचरच्या १० गिर्यारोहकांकडून राष्ट्रध्वजास तैल बैला सुळका सर करून मानवंदना देण्यात आली.
विडिओ
तैलबैला गावानजीक किल्लेवजा सुळका असून तो आरोहनाच्या कठीण श्रेणीत मोडतो, या सुळक्याच्या चारही बाजूंनी आरोहण करता येते.
साह्यकडा एडवेंचरच्या १० गिर्यारोहकांनी तैल बैल सुळक्याची (Inner Wall) दुसरी प्रस्तरभिंत सर करून भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मांवनदना देऊन प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला.
मोहिमेचे नेतृत्व अनेक सुळके सर केलेले श्रीराम पवळे यांनी केले तर विलास कुमकर यांनी सुळक्याला लीड क्लाइम्ब केला त्यांना श्रीराम पवळे यांनी सुरक्षा दोर (बिले) दिला.
२५० फूट आरोहण उंची असलेल्या सुळक्यावर एकूण ३ स्टेशन तयार करण्यात आले, बेस स्टेशन ची धुरा किरण पोतले यांनी सांभाळली, पहिल्या स्टेशनवर राहुल खोराटे, दुसऱ्या स्टेशनवर श्रीराम पवळे आणि समिटवर विलास कुमकर यांनी सर्व सुरक्षततेची खात्री केली तद्नंतर इतर सदस्यांनी कडक झुमरिंग (आरोहण पद्धती) करत समिट नोंदवला.
मोहिमेत श्रीराम पवळे, विलास कुमकर, किरण पोतले, राहुल खोराटे, सागर मांडेकर, अविनाश जगताप, स्वप्नील साळुंखे, अरुण निकम, अखिल जाधव, वैभव फापाळे हे गिर्यारोहक सहभागी होते.
अशी माहिती बाबाजी चौधरी (अध्यक्ष, साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान) यांनी दिली.
Comments are closed