पुण्यात राजकीय वातावरण तापले . सेना भाजपात बाचाबाची .
पुणे,दि.५ ( punetoday9news) :- येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना त्यात सोमय्या प्रकरणाने भर पडली आहे. पुण्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.
विडिओ पाहण्यासाठी
मात्र अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्व राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.
सोमय्या हे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला. इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले. तर काहींनी त्यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी questions bank.
या प्रकारात शिवसैनिकांनी आपली बाजू मांडताना सांगितले कि आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो असताना त्यांची गाडी आमच्या अंगावर घालण्यात आली . आमचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही.
तर सोमय्या यांनी ट्विट करत असे म्हटले आहे.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
दुसरीकडे संजय राऊत यांनी हि ट्विट करत आपण सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे.
मी सोमवारी दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आहे…
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/GZXjEkzHW1— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2022
Comments are closed