पिंपळे गुरव, दि. ५( punetoday9news):- नवी सांगवी मल्हार गार्डन येथे वसंत पंचमी निमित्त ज्ञानाची देवता म्हणजे माता सरस्वतीचा दर वर्षा प्रमाणे याही वर्षी बंगाली समाजातील नागरिकां कडून माता सरस्वतीचे मूर्ती पूजन व होम हवन करून त्या नंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी कावेरी जगताप यांच्या हस्ते माता सरस्वती देवीची पूजा करण्यात आली. बंगाली समाजातील नागरिक हे सरस्वती देवीचे नित्य नियमित पूजन करीत असतात. पण वर्षातील दोन दिवस मूर्तीची मनोभावे स्थापना करतात पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीचे पूजा पाठ होम हवन व दुसऱ्या दिवशी आनंदाने देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या कावेरी जगताप म्हणाल्या, “भारतीय संस्कृतीत विद्येचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय नागरिक हे ज्ञान, शक्ती व भक्ती चा समन्वय साधून विकासाच्या दिशेने वाटचाल करतात.”
माता सरस्वती देवी ही ज्ञान देवता असून बंगाली समाजातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेतील पहिल्या दिवसाची सुरुवात सरस्वती देवी चे पूजन करून शालेय जीवनाची सुरुवात करतात असे त्या प्रसंगी उपस्थित असणारे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले.
या प्रसंगी संजय जगताप,संजय मराठे, बच्चू माल, सोमनाथ माल,मिठू माल,श्रावंती माल,झुमा माल,बिस्वजित माझी, संपा माझी,दुर्गा पात्रा,शिप्रा पात्रा,शिप्रा दास, प्रिया माल, पूजा माल, पियूष माल, झुंपा आस, पोम्पा बेरा, अपर्णा तुरे, सुबीर पात्रा,पिंटू पात्रा,पलास माल आदी मान्यवर व बंगाली समाजाचे नागरीक उपस्थित होते.
Comments are closed