मुंबई, दि. ६( punetoday9news):- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (दि.६) रविवारी सकाळी निधन झाले.
वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्याची बातमीही आली होती मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.
Comments are closed