पुणे, दि. ९( punetoday9news):- महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला आहे .

त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील  पाणीपुरवठाही विस्कळीत 

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे . तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे .नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.




Comments are closed

error: Content is protected !!