समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही सामाजिक दायित्वाची भावना शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची आहे.कोणत्याही शैक्षणिक संस्था, शाळा यांचा विकास हा सामाजिक दायित्वातूनच होत असतो त्यामुळे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून काम करणार्या उद्योग समूहांची शाळा आणि समाजाला नेहमीच गरज भासते. सामाजिक बांधिलकीतून खासगी कंपनी कडून सीएसआर अंतर्गत शाळेला साहित्याचे केलेले सहकार्य महत्वाचे ठरते. असे मत जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी सुभाष गारगोटे यांनी केले.
पिंपरी,दि. १०( punetoday9news):- लुमॅक्स या उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्वातून महाळूगे इंगळे येथील श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयास विद्यार्थ्यांसाठी बेंच,प्रोजेक्टर, क्रीडा साहित्य प्रदान कार्यक्रम प्रसंगी गारगोटे बोलत होते.
यावेळी महाळूगे इंगळेच्या सरपंच मयुरी महाळूकर, उपसरपंच वैशाली महाळूकर, ग्रामपंचायत सदस्य शेखर तुपे, किशोर भालेराव, सोनाली गायकवाड, जनता शिक्षण संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी अनिल ठुबे, संचालक प्रा. रामदास खाटमोडे, लुमॅक्स उद्योगाचे व्यवस्थापक बाजीराव खांडेकर, सहव्यावस्थापक मिलिंद प्रधान, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक युवराज घोळवे, पांडुरंग धावड, ज्ञानदीप शेळके, सुनील शेळके, सचिन पाखरे आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन पांडुरंग धावड यांनी केले आभार ज्ञानदीप शेळके यांनी मानले.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्ज्वल व यशस्वी करण्यासाठी अभ्यासरूपी तपस्या करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे नाहीत. फक्त त्यांनी मनावर घेणे गरजेचे आहे तर ते स्वत:चा विकास करतील.याच अनुषंगाने या प्रशालेला आम्ही आवश्यक असणाऱ्या साहित्याची मदत केली असून विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन स्वतःबरोबर शाळेचे नाव सुद्धा उज्वल करावे असे मत बाजीराव खांडेकर यांनी व्यक्त केले.
Comments are closed