पुणे दि.१०( punetoday9news):- जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२० चा निकाल घोषित करण्यात आला असून तो १० https://gdca.maharashtra.gov.in आणि https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहावयास उपलब्ध राहील.
फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थींना २७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपलेकडील लॉगइन व पासवर्डचा वापर करून अर्ज करता येईल.
फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थींनी फेरगुण मोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी शुल्क रु.७५ अधिक बँक शुल्क याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत २७ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री २२.३० पर्यंत राहील. सदर चलन बँकेत ११ फेब्रुवारी २०२२ ते २ मार्च २०२२ या कालावधीत बँकेच्या कामकाजाच्या वेळेत भरणा करावे. विहीत तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असेही जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डच्या सचिवांनी कळविले आहे.
Comments are closed