मुंबई, दि. ११( punetoday9news):-
हिजाब प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांना राज्यात शांतता राखण्याचे व सामंजस्यपूर्ण भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय पक्षांनीही राज्यात विनाकारण अस्वस्थता निर्माण करून पोलिस विभागाचे काम वाढवू नये तसेच शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.
आपण अनावश्यकदृष्ट्या जाती-धर्मात तेढ निर्माण करायला लागलो तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहीजे. अशाप्रकारचे आंदोलन करू नये अशी भूमिका सर्वांनी घ्यायला हवी, असे गृहमंत्री म्हणाले.
Comments are closed