पिंपरी, दि. ११( punetoday9news):-
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही वक्तृत्व स्पर्धा येत्या 19 फेब्रुवारी निगडी येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र घोडके यांनी दिली.
राजेंद्र घोडके यांनी सांगितले, की या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, आपण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत, वेदना जाणावया चला जागवू संवेदना, 2030 च्या नेतृत्वासमोरील आव्हाने, मुद्दा तिला माणूस मानण्याचा आहे, आदी विषय देण्यात आले आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 8459232203 व 7796475969 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed