● जनावरांमधील विविध साथींच्या रोगांवरील लस उत्पादित होणार. 

●???? बर्ड फ्ल्यू, देवी सारख्या रोगांवर प्रतिबंधक लस तयार होणार. 

औध, दि. १२( punetoday9news):-  पुणे शहरातील औध येथील जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,जिल्हाधिकारी राजेश देशमुख , सचिंद्र सिंह आयुक्त पशुसंवर्धन , जगदीश गुप्ता, प्रधान सचिव (पदुम) , डाॅ. विनायक लिमये, सहआयुक्त पशुसंवर्धन व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी शहरीकरणातही दुग्ध व कुक्कुट व्यवसायाचे महत्व सांगितले तसेच आपल्या पोल्ट्री व्यवसायातील आठवणी ही सांगितल्या.  ते सांगताना एक एकर जमीन चार गायींमुळे खरेदी करणे कसे शक्य झाले होते ते सांगितले. ग्रामीण भागातील कुटुंब व्यवस्था व शेळी पालन, कुक्कुट पालन याचे व्यावसायिक चक्र सांगितले.  तसेच भविष्यात इतर देशातून तंत्रज्ञान व इतर हायब्रीड जातींच्या गायी आणणार असलो तरी देशी गायींना सांभाळून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी पुण्यात सर्वसाधारण प्रयोगशाळा होती ती फक्त लेवल १ प्रयोगशाळा होती आता लेव्हल टू आणि थ्री हा दर्जा दिल्यामुळे सर्व अध्यावत नवीन टेक्नॉलॉजीयुक्त प्रयोगशाळा उभी राहणार आहे. पुर्वी  इतर राज्यांकडे नमुने तपासणीसाठी पाठवले जात होते.  ते आता इथेच शक्य झाल्याने प्राण्यांच्या त्वरित उपचारासाठी मोठा फायदा होणार आहे.

पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने होणार
जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांना ब्रुसेल्लॉसिस, लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंजा, रेबीज आदींचे रोग नमुने निदानासाठी पाठवता येणार आहे. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणामुळे पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावयास मदत मिळेल.

कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ६१ कोटी २८ लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकांचा (जी.एम.पी.) अवलंब करुन कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची टर्न की आधारावर उभारणी करण्यात आली आहे.  प्रयोगशाळेतील सर्व कामकाज हे बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम या केंद्रीय संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. कुक्कुट पक्ष्यातील मानमोडी, लासोटा, कोंबड्याची देवी, मरेक्स या तर शेळ्या-मेंढ्यातील देवी व पीपीआर या रोग देवी प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

 

 

 




 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!