नवी दिल्ली,दि.१४( punetoday9news):- भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना ( ISRO ) म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची मोहीम यशस्वीपणे फत्ते केली आहे .
आज पहाटे 5.59 वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल ( PSLV – C52 ) येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं . इस्त्रोनं आज सकाळी PSLV – C52 मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले आहेत . यामध्ये EOS 04 रडार इमेजिंगचा समावेश आहे .
यामुळे शेती , वनसंपदा आणि वृक्षारोपण , मातीमधील आर्द्रता , जलविज्ञान , पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत . इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यात आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत . 2022 चं पहिलं मिशन यशस्वी फत्ते झाल्यानं इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त
पहा: ISRO च्या PSLV-C52 ने EOS-04 आणि दोन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले
सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून सह-प्रवासी उपग्रह.
Comments are closed