पुणे, दि. १५( punetoday9news):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभा निमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विधि महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री महोत्त्सवाचे विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले.
यामध्ये पोस्टर प्रदर्शन, रांगोळी, कविता व गीत गायन कार्यक्रमाचे ऑनलाईन , ऑफलाइन माध्यमातून आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दीपक पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संतोष सुतार, प्रा. माधुरी सरोदे, ग्रंथपाल सनबोर काझी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित कलाप्रकार सादर केले. ज्योत्स्ना गायकवाड या विद्यार्थिनीने गीत सादर केले. पवन भंडारी, पवन जाधव, उदयकांत तोरणे, ऋषिकेश जाधव व मोनिका हिने सावित्रीबाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्व पोस्टरच्या माध्यमातून सांगितले.
तसेच गीत गायन व कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाविषयक कार्य, समाज सुधारणे विषयी कार्य व आजची स्त्री याविषयी विविध प्रकार सादर करण्यात आले .
Comments are closed