पुणे, दि. १५( punetoday9news):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरुर व सकाळ यिन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न झाले.
समारोप कार्यक्रमासाठी संस्थेचे समन्वयक शिवाजी पडवळ, प्राचार्य डॉ. अमोल शहा उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बापूसाहेब थिटे, सेक्रेटरी धनंजय थिटे, प्राचार्य डॉ. द्वारकदास बाहेती यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संतोष साकोरे, तानाजी गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी प्रतिनिधी रोहित कदम, विशाल चव्हाण, श्रीकांत खताळ, प्रसाद जगताप, ओंकार कोरडे, संजीवनी रोकडे, श्रुती काळदाते, अथर्व पठारे, तेजस राऊत, अपेक्षा थिटे, निकिता डफळ व प्रणव खैरे ह्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. सचिन कोठावदे यांनी केले व आभार एन एस एस विद्यार्थी प्रतिनिधी मोनिका तांदळे हिने केले.
Comments are closed