पिंपरी,दि.१७( punetoday9news):-
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही झाडांना पाणी देऊन जतन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, संस्थेने रोपण केलेल्या राज्यभरातील वृक्षांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. समाजसेवा आणि पर्यावरणाबाबत त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी मोरे यांचे केले.
अरुण पवार यांच्या तर्फे भंडारा डोंगर परिसरात लावलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून संपूर्ण उन्हाळ्यात झाडे जपण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही या परिसरातील झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. यावेळी ह.भ.प. शिवाजी मोरे यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार करीत असलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले.
ह.भ.प. शिवाजी मोरे म्हणाले, की चारा पाण्यावाचून हरीण, माकडे, कोल्हे, लांडगे तसेच पक्ष्यांना पाण्यावाचून जीव गमवावा लागत आहे, हे जाणून मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार यांनी चारा पाण्याची व्यवस्था केली आहे. यंदाही या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेकजण वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा इव्हेंट करतात. त्यांचे संगोपन करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. पण अरुण पवार हे आपण लावलेल्या सर्व झाडांना पाणी देऊन ती जतन करतात. तसेच गोरगरीब गरजू लोकांना ते नेहमीच मदत करीत आले आहेत.
शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी सांगितले, की आज समाजामध्ये अनेक लोक असे आहेत जे संघर्ष करून मोठे होऊन सुखाचे आयुष्य जगतात. मात्र, त्या संघर्षाची जाणीव ठेवून समाजासाठी काम करणारे अरुण पवार यांच्यासारखे फार कमी लोक असतात. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना केलेली अन्नधान्यरुपी मदत खूप मोलाची होती. अंध अपंग, विद्यार्थी यांना नेहमीच सढळ हाताने मदत करीत आले आहेत.
अभियंते नितीन चिलवंत यांनी सांगितले, की मराठवाड्यातून पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या लोकांसाठी मराठवाडा भवन असावे, ही अरुण पवार यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. त्यामुळे अरुण पवार म्हणजे मराठवाडावासियांचे चालते बोलते व्यासपीठ आहे. गरजू विद्यार्थी, गरीबांना आर्थिक मदत करणे, हे दातृत्व आम्ही अरुण पवार यांच्या कामातून शिकलो. वृक्षारोपणासोबतच वन्यप्राण्यांविषयी त्यांची असलेली तळमळ दरवर्षी उन्हाळ्यात त्यांच्या कृतीतून जाणवते.
उद्योजिका प्रिती काळे म्हणाल्या, की पुण्यासारख्या शहरात स्थायिक होऊन अरुण पवार यांनी बांधकाम क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. पर्यावरण, महिला सक्षमीकरण, धार्मिक क्षेत्रात ते अतूलनीय काम करीत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा, देहू आळंदी स्वच्छता अभियान, मराठवाड्यातील बांधवांची नावनोंदणी, मोफत पाणी पुरवठा, मुक्या प्राण्यांना अन्न पाणी पुरवठा, गडकिल्ले संवर्धनासाठी मदत आदी कामे उल्लेखनीय आहेत.
भारुडकार कृष्णाई उळेकर यांनी सांगितले, अरुण पवार यांना समाजमानाची जाणीव आहे. त्यांनी आपलं सर्वस्व समाजकार्यात व्यापून टाकलं आहे. मी आज भारुडकार म्हणून उभी आहे, ती पवार यांनी दिलेल्या संधी आणि प्रोत्साहनामुळे. कलाकारांना कला जपण्यात अडचणी येतात. मात्र, अरुण पवार यांच्यासारखे लोक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना भरारी घेण्याची उम्मेद देतात.
ज्ञानेश्वर केवळराम म्हणाले, की ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची उर्मी असते, त्यांना मन शांत बसू देत नाही. अगदी त्याप्रमाणे अरुण पवार यांनी हलाखीच्या परिस्थितीतून येऊन बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळविलाच; शिवाय पर्यावरण, सामाजिक, पारमार्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नाव कमावले आहे. गरजू लोकांना विविध प्रकारे मदत करीत त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
रत्नाकर खांडेकर यांनी सांगितले, की अरुण पवार यांनी आपले शिक्षण गरीबीतून पूर्ण केले, याची जाणीव ठेवून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना ते मदत करीत आले आहेत. आपण मोठे झालो, तरी गरीबीची जाणीव त्यांनी ठेवली आहे, पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाड्यातील लाखो लोक राहतात. त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम करून त्यांच्या अडीअडचणी, सुखदु:खात ते सहभागी होतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते करीत असलेले वृक्षारोपणाचे कार्य खूप मोलाचे आहे. पंढरीच्या वारकर्यांची ते दरवर्षी सेवा करीत आहेत. त्यांना फळ वाटप, जेवण, पालखी सोहळ्यासोबत पाण्याचे टँकर देणे आदी सेवा ते मनोभावे करीत आहेत.
Comments are closed