पिंपरी,दि. १८( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 6 हजार 497 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला . महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील सुट्टीवर असल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ऑनलाईन पद्धतीनेही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
त्यानुसार या अंदाजपत्रकाची खास वैशिष्टये

● मनपाच्या विकासकामांसाठी र.रु. १६१८.६८ कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद केली आहे .

● अ क्षेत्रीय कार्यालय र. रू. २८.२३ कोटी.

● ब क्षेत्रीय कार्यालय र. रू. ८.९४ कोटी.

●  क क्षेत्रीय कार्यालय र.रु .१९.३१ कोटी .

● ड क्षेत्रीय कार्यालय र.रु. ७.३८ कोटी .

● इ क्षेत्रीय कार्यालय र.रु. ६.७१ कोटी .

● फ क्षेत्रीय कार्यालय र.रु.१२.९१ कोटी .

● ग क्षेत्रीय कार्यालय र.रु .८.२० कोटी .

● ह क्षेत्रीय कार्यालय र.रु .२३.४६ कोटी .

● पाणी पुरवठा विशेषनिधी र.रु .२०० कोटी .

● अमृत योजनेसाठी र.रु. ३३ कोटी तरतूद .

 

● स्वच्छ भारत मिशनसाठी र.रु .१० कोटी तरतूद . ● स्मार्ट सिटीसाठी र.रु .५० कोटी तरतूद .

● दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद र . रु . ४४.०६ कोटी .

● प्रधानमंत्री आवास योजना र.रु .१० कोटी तरतूद

●अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरीता र.रु. ४.५० कोटी तरतूद .

● PMPML करीता अंदाजपत्रकात र.रु. २१९ .३८ कोटींची तरतूद .

● शहरी गरीबांसाठी ( BSUP ) अंदाजपत्रक तरतूद र.रु. १४५७.११ कोटी .

● जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद र.रु .४५ कोटी

● विशेष योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या लेखाशिर्षावर र.रु. ९३८.३८ कोटी

● मेट्रो प्रकल्पासाठी र.रु. २५ कोटी

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे २०२२- २३ आर्थिक वर्षातील महत्वाचे उपक्रम. 

प्रभाग क्र . २८ पिंपळे सौदागर मधील आरक्षण क्र . ३६७ अ , ३६२ खेळाचे मैदान विकसीत करणे व शिल्प वॉल करणे .

● मौजे पिंपळे गुरव प्रभाग क्र . ५६ वैदूवस्ती जवळकरनगर येथील खेळाचे मैदान या आरक्षणामध्ये विविध प्रकारच्या खेळपट्ट्या विकसीत करणे व इतर स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करणे .

● प्रभाग क्र ११ मधील पूर्णानगर येथील से . क्र . १८ सीडीसी मधील मोकळी जागा क्र .४ पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकसित करणे .

● प्रभाग क्र . १ टाळगाव चिखली येथे संतपीठ विकसीत करणे .

●  पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नवीन १० उद्याने १७ एकर क्षेत्रावर विकसित करण्याचे कामकाज चालु आहे .

●  दिघी सर्वे नं . ७७ येथे १० एकर क्षेत्रावर मियावाकी पध्दतीने २,५०,००० वृक्षारोपण करणेत येणार आहे .

● माहिला स्वंयसहाय्यक गटांसाठी ( SHG ) एक संरचनात्मक ढाचा तयार करणे .

● प्रभाग क्र . १ चिखली येथील आरक्षण क्र .१ / ९ ६ मध्ये टाऊन हॉल विकसित करणे . –

● प्रभाग क्र . १० पिंपरी येथील स.न. ३१ / १-१ ते ५ व ३१/१ ब – २ ते ६ मधील जागेमध्ये नि : समर्थ ( दिव्यांग ) साठी कल्याणकारी केंद्र बांधणे .

● कौशल्य विकास रोजगाराभिमुख करून नामांकित संस्थांचा सहभाग वाढवणे .

●तृतीयपंथी यांच्या साठी स्वतंत्र स्वच्छालये उभारणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .

● पे अँड पार्क योजनेतून शहरात होणारी वाहतूकीची कोंडी दूर करणे .

● महानगरपालिकेच्या सर्व इमारती दिव्यांगांसाठी सोयीच्या करणे.

● पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मिळकतींची मिळकत कराची संगणक प्रणाली सुटसुटीत व ग्राहकपोयोगी करणे

● पिंपरी चिंचवड शहरामध्ये वैद्यकीय सुविधांसह अत्याधुनिक श्वान पार्क विकसित करणे . पशुवैद्यकीय दवाखाने व फिरत्या गाड्यांची व्यवस्था करणे .

● स्थापत्य विभागामार्फत शहरासाठी नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करणे .

● महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये EV (इलेक्ट्रॉनिक व्हेईकल ) गाड्यांचा समावेश करणे.

●CCTV चे जाळे संपूर्ण शहरात पसरवून सिटी सर्व्हलन्स व स्मार्ट ट्राफिक द्वारे Real Time Tracking व गुन्हे प्रतिबंधक वातावरण निर्मिण करणे .

● नविन भोसरी रूग्णालय , नविन जिजामाता रूग्णालय , नविन थेरगाव रूग्णालय , कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रूग्णालय आकुर्डी येथे रूग्णसेवा २४x७ पध्दतीने सुरू करणे .

● सर्व प्रभागात व विभागीय कार्यालयात मल्टी नोडल पार्किंग स्लॉट विकसित करणे .

● सर्व प्रभागात फुड कोर्ट विकसित करणे . शहरातील वाहनांद्वारे होणारे हवा प्रदुषण कमी करण्यासाठी नागरीकांना सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहन देऊन शहर Cycle Friendly City बनवणे .

● रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणा – या व्यवसायीकांसाठी विक्री क्षेत्र ( Vending Zone ) विकसित करणे .

● महानगरपालिकेची नविन प्रशासकीय इमारत बांधणे .

● हस्तांतरण स्थानके विकसित करून कच – याचे विलगिकरण सुनियोजित करणे .

● आंतराष्ट्रीय दर्जाच्या सिटी सेंटरचा विकास करणे

● बर्ड व्हॅली , तारांगण , सर्पोद्यान चे काम पूर्ण करून नागरीकांसाठी उपलब्ध करणे .

● शहराचा सांस्कृतीक वारसा जोपासण्यासाठी नविन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणे .

● शहराची ” स्पोर्टस हब ” अशी ओळख होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करणे .

● आंतराष्ट्रीय पिंपरी चिंचवड मॅरेथॉन स्पर्धा सुरू करणे .

● MIDC क्षेत्रामध्ये साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा ( Material Recovery Facility ) उभारणे .

● शहराचा जल : निसारण व्यवस्थेचा संपूर्ण अभ्यास करून नद्या , नाल्यांमध्ये जाणारा मैला पुर्णपणे थांबवणे .

● जिजाऊ क्लिनिक

● सोशल इम्पॅक्ट बाँड ( SIB )

● उच्च कार्यक्षमता क्रीडा केंद्र ( High Performance sports center )

● झोपडपट्टी विकासासाठी महिला गटाद्वारे सामुदायिक शौचालयांची देखभाल

●डिजिटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम (DHTS)

● स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट

● E- Classroom प्रकल्प

● शैक्षणिक सल्लागार

● शिक्षण विषयक नाविन्यपूर्ण योजना

 

 

 




 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!