पिंपरी,दि. १९( punetoday9news):-
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली .
 “अतुलनीय वैश्विक योध्या, कुशल प्रशासक, छ. शिवाजी महाराजांची ओळख आहे. ते केवळ मराठ्यांचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रशासनाचा, गनिमी काव्याचा, युद्धतंत्राचा आज जगभर अभ्यास केला जातो.
महाराजांनी जातीभेद, धर्मभेद मानला नाही. ते धार्मिक होते परंतु सहिष्णू होते. त्याकाळच्या शासन व्यवस्थेत त्यांनी भूमापन करून ग्राम व नगर व्यवस्था निर्माण केली, शेतीसाठी शेततळी बांधणे, वृक्ष लागवड करणे, बंधारे बांधणे, तसेच पतसंस्थांची निर्मिती केली, न्यायव्यवस्था, आरमारची निर्मिती, गड-कोटव्यवस्था अशी चौफेर शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आजच्या शासक प्रशासनासाठी महाराजांचे कार्य आदर्शदायी आहे. तरुणांनी महाराजांच्या जीवन कार्याचा अभ्यास केला पाहिजे.” असे विचार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी मांडले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. विषय होता  “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण.” प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर हे उपस्थित होते.

यावेळी पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले की, “छत्रपतींचा इतिहास नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवराय हे जगातले एकमेव असे राजे आहत जे चारशे वर्ष झाली तरी रयतेच्या मनामनात आहेत. आजही स्त्रियांना पुरुषांकडून शिवरायांच्या आदर्शाची अपेक्षा आहे. आपल्या जीवनातील स्वप्न, ध्येय्य पूर्ण करण्यासाठी तरुणांनी शिवरायांचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे.”
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “अन्याय अत्याचारा विरुध्य संघर्ष करून महाराजांनी सुराज्य व्यवस्था निर्माण केली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही अशी प्रशासन व्यवस्था तयार केली महाराजांना रयतेची जाण होती.

या रयतेसाठी त्यांनी स्वराज्य उभे केले. महाराजांचा आदर्श ठेवूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. मनोगत रयत विद्यार्थी विचार मंचाचे धम्मराज साळवे  यांनी व्यक्त केले. सूत्र संचलन डॉ. कामायनी सुर्वे यांनी व्यक्त केले. आभार रयत विद्यार्थी विचार मंच प्राजक्ता गायकवाड यांनी मानले .


महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण जगदाळे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉ. नीळकंठ डहाळे, कार्यालयाच्या सौ. उज्वला तावरे रयत विद्यार्थी  विचार मंच चे प्रदेश महासचिव संतोष शिंदे ,अतुल वाघमारे,विक्रांत शेळके,मयूर जगताप,अभिजित साळुंखे,अभिजित लगाडे,स्वराज कांबळे,आकाश गुंजाळ,प्रमोद लोंढे ,योगेश कांबळे,प्राजक्ता गायकवाड,प्रगती कोपरे,भाग्यश्री आखाडे,प्रणाली कावरे,प्रतिभा बनसोडे,माधवी खरात,किरण ओपळे,   विकी वाघमारे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
https://youtu.be/D6JKgsRgj7w
https://youtu.be/NJ_g1utXuPc

 

#

Comments are closed

error: Content is protected !!