तुमच्या मते यंदाच्या निवडणुकीत नागरिकांसाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता ?

View Results

Loading ... Loading ...

पिंपरी, दि.२१( punetoday9news):-  देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविणे, पायाभूत सुविधांसह,‍ विविध क्षेत्रात पिंपरी चिंचवडची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी शहराची गरज ओळखून भविष्यातील  शाश्वत विकासावर भर दिला जाईल. याकरीता, पर्यावरण विकासासह नागरी सेवा सुविधा, विविध योजना आणि उपक्रम हाती घेवून ते पूर्ण करण्यासाठी महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यादृष्टीने या वर्षीचा अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरेल, अशी मा‍हिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२२- २३ च्या अर्थसंकल्पासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी, पत्रकारांसमवेत संवाद साधताना आयुक्त राजेश पाटील बोलत होते.

ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे, त्यादृष्टीने निधीचे नियोजन करण्यात करण्यात आले आहे. मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे शिक्षण देण्यासाठी शाळांचे ट्रांस्फॉर्मेशन करण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक तज्ञांची नेमणूक करून १२३ शाळांमध्ये म्युनिसिपल ई- क्लासरुम प्रकल्प राबविण्यात येत आहे.  शहरातील पाणी पुरवठयासाठी भामा आसखेड, आंध्रा धरणाचे प्रकल्प पूर्ण करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. शहरातील रस्ते निर्मीतीसाठी आठ ठिकाणी हॉटमिक्स प्लाँट उभारण्यात येणार आहे.  या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. रस्त्यांची सध्य:स्थ‍िती व तांत्रिक बाबींचा विचार करून यापुढे रस्ते खोदाईबाबत निर्णय घेण्यात येतील. प्रेक्षणीय स्थळे, पर्यटनाला चालना देण्यावर भर राहिल. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिटी सेंटर व महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन आहे. शहरातील जवळपास १५ हजार बचत गटांना योग्य मार्गदर्शन व त्यांच्यासाठी संरचनात्मक ढाचा तयार करणे, अपुर्ण कामे वेळेत मार्गी लावणे, मनपाच्या कामात गतिमानता आणणे, महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी व नागरिकांची दमछाक टाळण्यासाठी कर भरणा संदर्भात सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करणे, तसेच, शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मनपाकडून जाहीरात धोरण ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ‍

            ग्रीन एनर्जी व सोलर एनर्जीला चालना देण्यासाठी शहरात चार्जींग पॉईंट उभारण्याचे नियोजन आहे. दोन वर्षाच्या कोविड कालावधीमध्ये मनपाच्या उत्पन्नात घट झाली असली तरी त्यानुसार, भांडवली खर्च व इतर आवश्यक कामांसाठी येणा-या खर्चाबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. मनपाच्या सर्व हॉस्पीटलमध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असून रुग्णांची माहिती संकलीत करण्यासाठी डिजीटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम (DHTS) कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉग पार्क उभारण्याबाबत मनपाचे नियोजन आहे. प्रशासनासोबतच नागरिकांनी देखील स्वच्छतेबाबत अग्रेसर भुमिका घेणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत वाटल्यास त्याचे कृतीत रुपांतर होईल. पर्यायाने देशात पहिल्या तीन शहरांमध्ये पिंपरी चिंचवडचा क्रमांक सर्वात स्वच्छ व सुंदर शहरांमध्ये असेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!