सांगवी,दि. २२( punetoday9news):-
शिवजयंतीचे औचित्य साधून जुनी सांगवी येथील ममतानगर मित्रमंडळाच्या वतीने वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदा शिवजयंतीचे औचित्य साधून वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, जवाहर ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मीनाताई अतुल शितोळे, सामाजिक कार्यकर्ते महेश भागवत, नगरसेवक संतोष कांबळे, मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, औदुंबर पाटील, ममता नगर मित्रमंडळाचे आधारस्तंभ व छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, मंडळाचे अध्यक्ष गणेश कोळी, उपाध्यक्ष साहिल म्हाळस्कर, सदस्य नायर, अतुल आबनावे, अनुप पानेकर, अभिषेक जाधव, अविनाश आबणावे, आदेश गायकवाड, अलविन पिल्ले, दीपक कदम, नितीन लोहोकरे, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर माई ढोरे यांनी ममतानगर मित्रमंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. अतुल शितोळे यांनी भविष्यात मंडळाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करीत मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. पाचशे महिलांना वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. आगामी काळात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
Comments are closed