सांगवी, दि. २२( punetoday9news):- चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगवी व पिंपळे गुरव परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यापैकीच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संतोष कांबळे व तृप्ती कांबळे यांनी केले आहे.
टेलिविजन वरील प्रेक्षकांना हास्य विनोदाने खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाचे पोस्टर्स पाहूनच लोकांची या कार्यक्रमा विषयीची ओढ अधिक असल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यातच सांगवीत फिनिक्स सेल्फी पाॅइंट ह्या उपक्रमासही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आता बुधवार (दि. २३) पीडब्ल्यूडी मैदानावर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
punetoday9news तर्फे घेतला जाणारा हा समस्येविषयीचा पोल १००% गोपनीय असून व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवून यात मत व्यक्त करणाऱ्याचे नाव. फोन वगैरे कसलीही वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही. आम्ही फक्त निष्पक्ष पणे जनतेच्या समस्या मांडतो. त्यामुळे वाचकांनी प्रत्येक सोमवारी घेतल्या जाणाऱ्या विविध समस्येविषयीच्या पोलमध्ये बिनधास्तपणे व्यक्त व्हावे.
आजचा प्रश्न
Comments are closed