पिंपरी,दि.२२( punetoday9news):- विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठीदेखील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही. शिक्षक अपरंपार अपार कार्य करीत असतो. निरपेक्षवृत्तीने काम करणारे शिक्षकच आदर्श नागरिक घडवितात असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष कविता आल्हाट यांनी केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने माळी महासंघ आणि माध्यमिक शिक्षक संघ, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शहरातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्री जिजाऊ पुरस्कार वितरण वेळी आल्हाट बोलत होत्या.
यावेळी शिक्षण मंडळाच्या सभापती माधवी राजपुरे,माजी महापौर अपर्णा डोके,नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, स्थायी समिती माजी सभापती संतोष लोंढे, माजी नगरसेवक चेतन भुजबळ, शेखर ओव्हाळ, काळूराम गायकवाड, हिरामण भुजबळ, अतुल क्षीरसागर, दीपक जगताप, सुरेश आल्हाट, चंद्रकांत वाघोले, विलास गव्हाणे, राजकुमार माळी, जी के थोरात, वसंतराव ताकवले, निवृत्ती काळभोर, के एस ढोमसे, सचिन दुर्गाडे, संतोष थोरात, महादेव फपाळ, संजीव वाखारे आदी उपस्थित होते.

रविना खरात या विद्यार्थिनीने आधुनिक जिजाऊ तर ईश्वरी फपाळ या विद्यार्थिनीने आधुनिक सावित्री या विषयावर सादरीकरण केले.

सूत्रसंचालन सरिता फपाळ यांनी केले तर आभार शिवाजी माने यांनी मानले.

पुरस्कार्थी

शैक्षणिक क्षेत्र

सोनल पाटील, मनिषा लेले, सविता माने, सुप्रिया खोपडे, शोभा जोशी, रंजना सहस्त्रभोजने, वैशाली चौधरी, आशा पालवे, नुतन जासूद, मंगल आहेर, जयश्री निंबारकर, अंजू सोनवणे, कविता शर्मा,
सोनिया चव्हाण, वनिता सावंत, सुनिता नवले, शोभा देवकाते, शैला बरवे, कविता भारंबे, धनश्री कांबळे

सामाजिक क्षेत्र
डॉ. सायली बारणे (वैद्यकीय सेवा), आकांक्षा कुदळे (पायलट), अनिता गोसावी
(रुग्णसेवा, रुग्णवाहिका चालिका), तृप्ती रामाणे
(औद्योगिक), सविता काळभोर
(आरोग्य विभाग ,सफाई कर्मचारी), सुवर्णा मुंगसे
(आश्वारोहण मोहीम)

 

_____________________________________

 

punetoday9news तर्फे घेतला जाणारा हा समस्येविषयीचा पोल १००% गोपनीय असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवून यात मत व्यक्त करणाऱ्याचे नाव. फोन वगैरे  कसलीही वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही.  आम्ही फक्त निष्पक्ष पणे जनतेच्या समस्या मांडतो. त्यामुळे वाचकांनी प्रत्येक सोमवारी घेतल्या जाणाऱ्या विविध समस्येविषयीच्या  पोलमध्ये बिनधास्तपणे व्यक्त व्हावे. 

आजचा प्रश्न

तुमच्या मते यंदाच्या निवडणुकीत नागरिकांसाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता ?

View Results

Loading ... Loading ...

 



 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!