सांगवी, दि. २४( punetoday9news):- चिंचवड मतदार संघातचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतून नगरसेवक संतोष कांबळे यांच्यातर्फे महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या विनोदाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला हसवणाऱ्या कलाकारांनी आपल्या विनोदी अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना खळखळून हसवले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांना नगरसेवक संतोष कांबळे व मित्र परिवाराने वाढदिवसाच्या निमित्ताने पगडी व शाल देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली परिसरात झालेल्या विकासकामांची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमासाठी चिमुकल्यांपासून जेष्ठ मंडळी पर्यंत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कलाकार (हास्य जत्रा फेम ) समीर चौघुले , वनिता खरात ,गौरव मोरे, प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, अश्विनी जगताप, शंकरशेठ जगताप, माऊली जगताप नगरसेविका शारदा सोनवणे, माधवी राजापुरे, उषा मुंढे, उज्वला गावडे, नगरसेवक हर्षल ढोरे, तुषार हिंगे, सागर अंघोळकर, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संजय जगताप, महेश जगताप, जवाहर ढोरे, संतोष ढोरे, धनंजय ढोरे,राहुल जवळकर, संजय मराठे, अमित पसरणीकर, आप्पा ठाकर, दत्ता येणपुरे, वनराई चे अध्यक्ष उद्योजक राजू धारिया, निमिष कांबळे, रविंद्र यादव राहूल विधाटे, प्रविण कांबळे, विक्रम कदम, सुनिल कांबळे, नामदेव आरासकर, सुधीर शिंदे, विनोद कांबळे, सुशांत रोकडे, आदित्य कांबळे, वसंत कांबळे,निखिल कांबळे, अमित बाराथे तसेच नगरसेवक संतोष कांबळे मिञ परिवार उपस्थित होते.
Comments are closed