दापोडी,दि. २५( punetoday9news):- समृद्ध आणि बळकट राष्ट्रनिर्मितीसाठी संस्कारक्षम वयातच मुलांना शालेय अभ्यासाबरोबर स्वावलंबनाचे धडे दिले पाहिजे. यासाठी स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची शिकवण विद्यार्थ्यांनी अंगीकारली पाहिजे. असे उदगार स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालय याच्या प्राचार्य अंजली घोडके यांनी दापोडी येथे केले.
प्रशालेतील वीर महाराणा प्रताप स्काऊट पथक व माता रमाई गाईड पथक यांच्या वतीने बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस ‘ चिंतन दिन ‘ म्हणून साजरा केला.
यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य विठ्ठल कढणे, पर्यवेक्षक बाळासाहेब जाधव, रवींद्र फापाळे, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव हेमंत बगनर, रामेश्वर होणखांबे, शिक्षक प्रतिनिधी संतोष शिंदे उपस्थित होते.
चिंतन दिनाचे महत्त्व लक्षात घेता कलाशिक्षक संजय शिरसाठ ज्यांनी बेडन पॉवेल यांचे हुबेहूब चित्र रेखाटून जागतिक स्काऊटचे चिन्ह व स्काऊट गाईडचे वचन लिहिलेला फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी गंगाधर पवार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीबद्दल मार्गदर्शन केले.
स्वच्छ व सुंदर भारत निर्मितीसाठी आपण केवळ र शासनावर अवलंबून राहता कामा नये. केवळ शासनाकडूनच अपेक्षा न ठेवता या देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपणही आपले कर्तव्य पार पाडली पाहिजेत. यासाठी स्काऊटच्या समुदाय विकास या अभ्यासक्रमातून मुलांना स्वावलंबनाचे धडे मिळतात. असेही प्राचार्या अंजली घोडके यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख संजय झराड यांनी केले. तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी केले. आभार स्काऊट विभाग प्रमुख मिलिंद संधान यांनी मानले.
Comments are closed