हडपसर,दि.२६( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंडक्शन प्रोग्रॅम व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड रमेश राठोड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. रंजना पाटील यांनी भूषविले. ॲड.रमेश राठोड यांनी कायदा क्षेत्रातील विविध संधी त्याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी, आर्मी, जेएमएफसी, बँक, कॉर्पोरेट सेक्टर इ. क्षेत्रांमध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याबद्दल मार्गदर्शन केले तसेच चांगले वकील होण्यासाठी कोणत्या गोष्टीची व कौशल्यांची आवश्यकता आहे याबद्दलही प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. रंजना पाटील यांनी महाविद्यालयातील विविध योजना व उपक्रम याबद्दल माहिती दिली तसेच महाविद्यालयात असलेली विविध विभाग आणि त्या सर्व विभागांची जबाबदारी आणि कामे याबद्दल सविस्तर माहिती प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आली त्याच बरोबर महाविद्यालयात शिस्तीचे पालन याविषयी सूचना दिल्या.
ग्रंथपाल सनबोर काझी यांनी पीपीटी च्या माध्यमातून कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. प्रशांत शेटे, अनघा मॅडम तसेच महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी वैशाली बहिरट,किशोर इंगळे उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पारपाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे व सेवक यांचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संतोष सुतार, महाविद्यालय परीक्षा अधिकारी प्रा. दीपक पाटील यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती जामदार या विद्यार्थिनीने केले व प्रा.माधुरी सरवदे यांनी आभार मानले.
Comments are closed