पिंपरी, २६( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा वर्गीकरण , कचरा कंपोस्टिंग , पाणी शुद्धीकरण , पुनर्वापर पावसाचे पाणी नियोजन आणि सौरऊर्जा वापर या नियमांचे पालन करणाऱ्या सोसायट्यांची पाहणी करून त्यांना फाईव्ह स्टार रेटींग देण्यात आले .
पिंपळे सौदागर येथे झालेल्या कार्याक्रमास आयुक्त राजेश पाटील , नगरसदस्य शतृघ्न उर्फ बापू काटे , विठ्ठल उर्फ नाना काटे , नगरसदस्या निर्मला कुटे , अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते .
यावेळी रोझलॅन्ड रेसीडेन्सी सोसायटी , पार्क रॉयल सोसायटी आणि पलाश सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांना सन्मानित करण्यात आले .
पिंपरी चिंचवड महानगरपलिका माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त पाटील यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या व शहरातील इतर सोसायटींनी यापद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करावे व कंपोस्टींग प्रकल्प उभारावेत असे आवाहनही केले .
Comments are closed