पिंपरी,दि. २८( punetoday9news):-
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन प्लास्टिकचा पुनर्वापर, वृक्ष संवर्धन, कोरोनाचा हाहाकार, विज्ञानाचा चमत्कार, वैज्ञानिक भाषणे, पर्यावरण पुरक शुभेच्छापत्रे, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या भूमिका, विविध प्रणालीचे मॉडेल आदी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते यांच्या हस्ते सरस्वती व सी. वी. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आरती राव, सचिव प्रणव राव, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षा बांठिया, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया मेनन, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका नीलम पवार, विज्ञान शिक्षिका जया पाटील, ऐश्वर्या नायर, निकीता अडसुळे, मोनिका रामस्वामी, दीपा गायकवाड, अंजुम पिरजादे, श्रद्धा पांढरे, कीर्ती शिंपी, ज्योती मोरे, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या ओम भिटे, हर्षला गायकवाड, कबीर वाडेकर, श्रेया खाडे, निलांजनी जगताप, साक्षी जाधव या विद्यार्थ्यांनी तयार केलेली पर्यावरणपूरक शुभेच्छापत्रे लक्षवेधक होती. अथर्व पाचर्णे याने सर सी. वी. रमण यांची भूमिका, संग्राम जगतापने न्यूटनची भूमिका आणि सोहम बनसुडेने या विद्यार्थ्याने स्टीफन हॉकिन्स यांची भूमिका साकारली. माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेल्या नाटिकेद्वारे विद्यार्थ्यांनी रामन प्रभावाबद्दल जाणून घेतले. विज्ञान प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल, प्रकाशाचे विकिरण प्रकल्प, सेस्मोमीटर, सिमेंट मिक्सर, जलचक्र, ज्वालामुखीचा उद्रेक, वनस्पतींचे भाग, चुंबकीय लहरी, फिरणारा रोबोट, अदृश्य शब्द, श्वसन प्रणाली, हायड्रॉलिक वापरून कार लिफ्टिंग, न्यूट्रलायझेशन, एसी कुलर, हृदय व उत्सर्जन प्रणालीचे मॉडेल आदी प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने घेतली.
भारतीय विद्यानिकेतनच्या दुसरीतील कृष्णाली वांद्रे या विद्यार्थिनीने प्लास्टिक बंदी व प्लास्टिकचा पुनर्वापर या गोष्टी आपल्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना दाखवून दिल्या. सहावीतील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन आणि नववीतील विद्यार्थ्यांनी कोरोनाचा हाहाकार, विज्ञानाचा चमत्कार या विषयांवर नाटक सादर केले.
आरती राव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना निसर्गात घडणार्या विविध घटनांमागील वैज्ञानिक सत्य शोधून बालवैज्ञानिक बनण्याचे आवाहन केले. हर्षा बांठिया यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व जिवन याची सांगड घालण्यासाठी प्रेरणा दिली. प्रिया मेनन यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व समजावून सांगितले. जया पाटील यांनी विज्ञानावर सुरेख माहिती देत विज्ञान आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.
शिक्षिका कीर्ती शिंपी, अंजुम पिरजादे, विद्यार्थी जैनिक सोनी व प्रथमेश देवकाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार शिक्षिका श्रद्धा पांढरे व ज्योती मोरे यांनी मानले.
Comments are closed