तुमच्या मते यंदाच्या निवडणुकीत नागरिकांसाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता ?

View Results

Loading ... Loading ...
शहरातील पदाधिका-यांनी घेतली शरद पवार यांची भेट.
पिंपरी,दि. २८( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटनेचे चांगले काम सुरु आहे. संघटना अधिक बळकट करावी. शहरात पक्षासाठी चांगले वातावरण आहे. महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करावी. सर्वांची एकी कायमस्वरुपी ठेवावी. एक दिलाने काम करावे. पक्षासाठी मेहनत करणा-यांना नक्कीच फळ मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरातील पदाधिका-यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शहरातील पदाधिका-यांनी आज (सोमवारी) शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, पंकज भालेकर, विनोद नढे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे आदी उपस्थित होते.




शहरात प्रभाग किती झाले आहेत. किती नगरसेवक वाढले आहेत. किती महिला नगरसेविका असतील. कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत. याची सविस्तर माहिती  शरद पवार यांनी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडून घेतली. गव्हाणे यांनी पक्ष संघटनेच्या कामाची माहितीही दिली.

त्यानंतर मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात मोठा मोर्चा काढला. शहरात पक्षाला चांगले वातावरण आहे. निवडणुकीत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. एकी कायमस्वरुपी ठेवावी. एक दिलाने काम करावे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे. कोणालाही नाराज करु नका. पक्षासाठी मेहनत करणा-यांना नक्कीच फळ मिळेल. महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तुम्ही पक्षाची संघटनात्मक बांधणी भक्कम करावी. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. शहरातील प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी पदाधिका-यांना केल्या.



Comments are closed

error: Content is protected !!