पुणे, दि. २८( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आळंदी येथील मराठी विभाग प्रमुख व माजी प्राचार्य डॉ.पांडुरंग मिसाळ उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल तसेच भाषेचा उगम,भाषेची जडणघडण आणि आजचे अस्तित्व याबद्दल मार्गदर्शन केले तसेच इतरही ग्रंथांचा व शिलालेखांचा आढावा त्यांनी घेतला. त्याचबरोबर मराठी भाषेला असलेली एक लयबद्धता व विनोद शैली याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना पाटील मॅडम यांनी भूषविले. त्यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल आणि भाषा समृद्ध करण्यासाठी आपण मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठी भाषेत लिहिले पाहिजे, मराठी भाषा वाचली पाहिजे व तिचा प्रसार प्रचार केला पाहिजे असे सांगितले.
सायली मोरे हिने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता सादर केली. त्याच बरोबर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात भिंतीपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले यात वैष्णवी काटे, ज्योत्स्ना गायकवाड आणि ऋषिकेश जाधव यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संतोष सुतार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ज्योत्स्ना गायकवाड हिने केले. तर ग्रंथपाल सनोबर काझी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक पाटील , प्रा. माधुरी सरवदे उपस्थित होते.
Comments are closed