या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

चिंचवड, दि. १( punetoday9news):- चिंचवड येथील यशस्वी   एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेन्ट  सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने   ‘व्यवस्थापन शास्त्र व माहिती तंत्रज्ञानातील अभिनवता’या विषयावर  आयोजित  करण्यात आलेली दोन  दिवसीय   आंतरराष्ट्रीय परिषद  उत्साहात  संपन्न  झाली.

इंडो युरोपियन एज्युकेशन फौंडेशन,पोलंड व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या संस्थांच्या सहकार्याने या परिषदेचे  आयोजन करण्यात  आले होते.कोविड १९  संकटाच्या   पार्श्वभूमीवर  ही परिषद  ऑनलाईन पद्धतीने आयोजित  करण्यात आली होती.    परिषदेचे  प्रास्ताविक करताना  आयआयएमएस  चे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे  यांनी सर्व व्याख्यात्यांचे  स्वागत  करीत  या परिषदेची  भूमिका स्पष्ट  केली.

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या  उद्घाटन सत्रात  प्रमुख  अतिथी असलेल्या  भूतान येथील गेडू  कॉलेज ऑफ बिझनेसचे प्रा. फुब दोरजी यांनी  त्यांच्या मनोगतात  बोलताना  विविध आस्थापनांसाठी  व्यवस्थापन आणि माहिती  तंत्रज्ञानातील  संशोधन  कशाप्रकारे  लाभदायी  ठरले  आहे  याबाबत  विविध उदाहरणांसह मार्गदर्शन  केले.  तर  उद्घाटन सत्रात विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाच्या  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता
डॉ. पराग काळकर  यांनी सांगितले कि, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे  सर्व  क्षेत्रात  खूप वेगाने बदल  होत असून आता विद्यार्थ्यांनी  या  अद्ययावत तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन  विचारशक्ती  विकसित करून कृतिशील  होणे  आवश्यक आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्रात इंडो युरोपियन एज्युकेशन फौंडेशन,पोलंड  आणि यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेन्ट  सायन्स (आयआयएमएस)  यांच्यात संशोधन, शिक्षण  क्षेत्रातील परस्पर सहकार्य सहकार्यासाठीचा  सामंजस्य  करार  करण्यात  आला.


उद्घाटन सत्रानंतरच्या  प्रथम सत्रात बोलताना इंडो युरोपियन एज्युकेशन फौंडेशन,पोलंडचे अध्यक्ष डॉ.प्रदीप कुमार यांनी   त्यांच्या  व्याख्यानात अभिनवतेमुळे(इनोव्हेशनमुळे) उत्पादनांची बाजारपेठ आणि सेवा कशा बदलतील तसेच  नावीन्यपूर्ण धोरण कसे महत्त्वाचे आहे  यावर मार्गदर्शन केले.  अभिनवतेसाठी सुधारणा, प्रत्यक्ष  कृती आणि परिवर्तन यावर भर देणे  गरजेचे  आहे असेही  ते म्हणाले.

यावेळी ब्लेझकान मलेशियाचे संचालक कौशिक मोहनराज यांनी  त्यांच्या व्याख्यानात बोलताना कामातील उत्कृष्टता, सुरक्षा, कार्यक्षमता आणि खर्च  नियोजनात  अभिनवता (इनोव्हेशन्स) वापरल्याने  अधिक परिणामकारकता  जाणवते. त्यांनी विद्यार्थ्यांना  त्यांच्या  करिअरच्या  वाटचालीत नाविन्यपूर्ण मार्गांनी विचार करण्यास  व  लागू करण्यासाठी प्रोत्साहित केले.

परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप  परिषदेच्या  मध्यवर्ती  संकल्पनेवर  आधारित नवीन आणि उल्लेखनीय उपक्रमांचे वर्णन करणाऱ्या संशोधन सादरीकरणाने  करण्यात  आला.
तर या  आंतरराष्ट्रीय  परिषदेच्या  दुसऱ्या  दिवशी
बुल्गारियाच्या वर्णा वाणिज्य विद्यापीठाच्या प्रा. सिल्व्हेना योर्दानोव्हा यांनी शिक्षण क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा  वापर   आणि त्याचा  भविष्यकालीन  परिणाम याविषयी  सविस्तर  माहिती सांगत  त्याचे फायदे आणि तोटे यावर चर्चा केली.
यावेळी इन्फोसिस  कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गजानन शिंदे यांनी  त्यांच्या  व्याख्यानात  तंत्रज्ञानाच्या  लवचिकतेविषयी भाष्य करीत हे तंत्रज्ञान  ग्राहक,  संघ विकास, विक्रेता आणि उत्पादक  किंवा मालक यांच्यासाठी  कसे फायदेशीर  आहे याबाबत  मार्गदर्शन  केले.

तर पोलंडच्या अप्लाईड सायन्स विद्यापीठाचे प्रा.डॉ.मारियुसझ कोलोसॉव्हस्की यांनी  याप्रसंगी जगभरातील नवनवीन संशोधन पोलंड देशाने कशाप्रकारे स्वीकारले  आहे याबद्दल  मार्गदर्शन  केले.

यावेळी मलेशियन  ग्रॅज्युएट  स्कुल ऑफ  एंट्रीप्रेन्युअरशिप  एन्ड  बिझनेस  युनिव्हर्सिटीच्या  अधिष्ठाता प्रा. डॉ. रोझलीन  अहमद  सौफी यांनी  त्याच्या मार्गदर्शन सत्रात विद्यापीठाच्या स्थापनेपासून नवोपक्रमांमुळे  कसे बदल  होत गेले याबद्दलचे अनुभव सांगितले.

या परिषदेच्या   समारोप  सत्रात भारत फोर्ज लि. कंपनीच्या  मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध  विभागाचे संचालक डॉ. संतोष  भावे यांनी  आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात  टिकून राहण्यासाठी नाविन्यता, अभिनवता अंगीकारणे  आवश्यक  असल्याचे सांगत उद्योग  क्षेत्रात अनेक  आव्हानांचा  एकाचवेळी सामना  करावा  लागत असल्याने अभिनवतेची  स्वीकारार्हता अत्याधिक गरजेची असून, संघभावना दृढ  करून कल्पक दृष्टिकोनाची  विचारधारा  विकसित करणे   कसे योग्य ठरते याबाबतचे  सविस्तर  मार्गदर्शन  केले.
या परिषदेत भारतासह भूतान, पोलंड, मलेशिया, बुल्गारिया आदी देशातून  आलेले निवडक शोधनिबंध  सादर करण्यात  आले.

या परिषदेत भूतान, पोलंड, मलेशिया, बल्गेरिया, टांझानिया, तुर्की, ओमान आणि भारतातील विविध राज्यामधील व्यवस्थापनशास्त्र  क्षेत्रातील  विद्यार्थी, प्राध्यापक  व तज्ञ्  सहभागी झाले होते.  या परिषदेच्या  समन्वयक डॉ.वंदना मोहांती   यांनी  आभार प्रदर्शन  केले.

 




 

Comments are closed

error: Content is protected !!