या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

लातूर, दि. १( punetoday9news):-   बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची मेहुण्यांनीच हत्या केली . लातूर शहरातील नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे . बहिणीला भाऊजी त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती – पत्नीच्या भांडणात पडले . त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली .

या मारहाणीत विजयकुमार पिल्ले ( वय 37 वर्ष ) यांचा मृत्यू झाला आहे . दोघा मेहुण्यांसह त्यांच्या आणखी दोन साथीदारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे . या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत .

या मारहाणीत विजयकुमार पिल्ले ( वय 37 वर्ष ) जखमी झाले होते . विजयकुमार यांना दवाखान्यात नेण्यात आले , मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले . या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आरोपी मेव्हुणे गणेश चटनाळे ( वय 23 वर्ष ) , बसवराज चटनाळे ( वय 32 वर्ष ) यांचे साथीदार ओंकार धोत्रे ( वय 20 वर्ष ) , शहानवाज पठाण ( वय 21 वर्ष ) या चौघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत .

 

 

 




 

 

Comments are closed

error: Content is protected !!